खिर्डी खु येथील विविध ठिकाणी झालेल्या विकास कामांचे फलक लावणे सक्तीचे…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील ग्राम पंचायतीला वित्तआयोग,जिल्हा परिषद, व इतर स्त्रौतां कडून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गत सुरू असलेले तसेच पूर्ण झालेल्या विविध कामाच्या ठिकाणी विकास कामाचे फलक लावण्यात यावे असे,सन १९९९ रोजीच्या शासनाच्या निर्णयाप्रमाणे परिच्छेद ( ब ) नुसार ग्राम पंचायती मार्फत केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या नवीन आणि दुरुस्तीच्या रु.२०,००० व त्यापेक्षा अधिक रकमेच्या कामाच्या ठिकाणी ५×४या आकाराच्या लोखंडी फलकावर कामाचा तपशील ऑईल पेंट ने लिहिणे सक्तीचे असताना येथे शासन निर्णयाची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे
ग्राम पंचायती मार्फत आजपावेतो जेवढे काम करण्यात आले त्या ठिकाणी माहिती दर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत अशा अनेक नियम बाह्य बाबी निर्दशनास येत असून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता यावी या करिता वरिष्ठ अधिकारी यांनी काळजी पूर्वक लक्ष देवून योग्य ती कारवाई करावी सर्व सामान्य नागरिकांना याची माहिती नसल्याने आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ग्राम पंचायतीने केलेल्या कामाच्या ठिकाणी फलक लावण्यात यावे अशी मागणी गावातील काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे …… ( भाग – 1)