खिर्डी खु.येथील २६ वर्षीय विवाहिता ३ वर्षाच्या मुलासह बेपत्ता.
खिर्डी खु.ता.रावेर (प्रतिनिधी)। येथील विवाहित महिला आपल्या लहान मुला सह बेपत्ता झाल्याने परिवारात चिंता वाढली आहे, या बाबत अधिक माहिती अशी की,योगेश प्रभाकर नेहेते वय(३७) रा, खिर्डी ,धंदा.नोकरी ,पाणी पुरवठा कर्मचारी असून हे १२ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जेवण करून आपल्या कामावर गेले होते.घरात त्यांची पत्नी दोन मुले व आई वडील होते.
योगेश नेहेते हे कामावरून घरी आले असता त्यांनी वडिलांना विचारले आई व माझी पत्नी कुठे आहे असे विचारले असता तुझी आई १.३० मि. वाजेला भाजीपाला विकण्यासाठी गावात गेली आहे.योगेश नेहते यांची पत्नी दामिनी उर्फ दुर्गा वय (२६) व मोहक वय (३) या लहान मुलाला सोबत घेवून १.४५ मिनिटांनी सासऱ्याला काही एक न सांगता घराबाहेर निघून गेली आहे. या बाबत त्यांनी नातेवाइकांना विचार पूस करून कुठेही मिळून आलें नाहीं. सदरील महिलेचे वर्णन.उंची.४ फूटअसून रंग गव्हाळ, चेहरा लांबट असून नाक सरळ आहे. काळ्या रंगाची चौकडी ची साडी व काळ्या रंगाचे ब्लाऊज घातले आहे.तसेच मोहक हा (३)वर्षाचा मुलगा रंगाने गोरा,चेहरा लांबट नाक सरळ उंची अडीच फूट.तसेच अंगात मेहंदी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पँट अशा प्रकारचे कपडे परिधान केलेले आहे. १४ आक्टो रोजी योगेश नेहेते यांनी दिलेल्या खबरी वरून निंभोरा पोलीस स्टेशन ला हरविल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस कर्मचारी अन्वर तडवी हे करीत आहे.