भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी खु.येथे आठवडे बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडीची तात्काळ सोडवावी– ग्रामस्थांची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। खिर्डी खु या गावी दर मंगळवार रोजी आठवडे बाजार बलवाडी रस्त्यालगत भरत असून भाजीपाला विक्रेते व तत्सम किरकोळ वस्तू विक्रेते हे आपली दुकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मांडत असतात तसेच गाव दरवाजा जवळ सुध्दा अनेक छोटी मोठी दुकाने मांडलेली असतात गावातील लोकांना ये जा करण्याचा एकमेव पर्यायी मार्ग असून एखाद्या वेळेस रुग्णास किंवा काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ वाहन नेण्यास अनंत अडचणी उभ्या असतात. तसेच गावात दुसऱ्या रस्त्यावरून वाहन नेण्या करिता अगदी तारेवरची कसरत करावी लागते.तसेच बाजार पेठ परिसरातील गट नं३ मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवरील घाण व उकिरडे उचलून त्या ठिकाणी साफसफाई करून पर्यायी जागा बाजारा करिता उपलब्ध करून देण्यात यावी.

निंभोरा रेल्वे गेट जवळ उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बलवाडी मार्गे वळविण्यात आली असून बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून गर्दी मुळे वाहतूक कोंडी ची समस्या उद्भवत असून समोरा समोर वाहन आल्यास एकमेकांना साईड देण्यास जागा नसल्यास एकदम बिकट अवस्था होते वाहन रिव्हर्स मध्ये घेताना पाठीमागे अनेक वाहने थांबून असल्याने वाहतूक काही काळ खोळंबते.या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आंधळेपणाची पणाची भूमिकेत असणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनास जाग येणार कधी अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न न सुटल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!