खिर्डी खु येथे ग्राम पंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन, भीमराव कोचुर।
खिर्डी ता.रावेर : खिर्डी खु येथे सन २००० मध्ये नवीन गावठाण परिसरात शासनाने लाखो रुपये खर्च करून १लक्ष लिटर पाण्याची टाकी बांधली असून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्यामुळे टाकी ओव्हर फ्लो झाल्यास केवळ पाणी पुरवठा कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसते.
असेच जर दररोज हजारो लिटर पाणी वाया गेले तर गावकऱ्यांना लवकरच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही
वारंवार या भागातील नागरिक पाण्याची टाकी भरल्यास पाणी पुरवठा कर्मचाऱ्यास फोन वरून माहिती देवून सुद्धा पाणी पुरवठा करणारी मोटर लवकर बंद केली जात नाही याला केवळ पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा आळशीपणा कारणीभूत असल्याचे चित्र दिसत आहे. हि बाब एका दिवसाची नसून आता नित्याचीच झाली आहे या पूर्वी गावातील नळांना दिवसातून दोन वेळा सुरळीत पने पाणी पुरवठा केला जात होता.
आता मुबलक पाणी असून देखील सध्या एकवेळ पाणी पुरवठा केला जात असून गोर गरीब लोकांजवळ पाणी साठविण्याची कोणतेही प्रकारचे साधने उपलब्ध नसल्याने कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो अशी ओरड गावकऱ्यांकडून होत आहे ग्राम पंचायत प्रशासनाने काळजी पूर्वक लक्ष देवून होणारा पाण्याचा अपव्यय टाळावा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.जिल्हा स्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे ही काळाची गरज आहे.