खिर्डी खु.येथे पूर्ण झालेल्या विकास कामांना माहिती दर्शक फलक लावण्यास टाळाटाळ, वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): ग्रामपंचायत ला गावातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात या करिता राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजनेंतर्गत भरघोस निधी देत असून त्यामध्ये कुठलाही आडमार्ग न ठेवता प्रशासकीय निधी सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करत असून त्या मध्ये १४ वा वित्त आयोग जनसुविधा,पाणी पुरवठा, विशेष प्रकल्प निधी, घरकुल, स्वच्छ भारत मिशन, मागासवर्गीयांच्या वस्तीचा विकास निधी २५/१५ या सर्व मिळालेल्या निधीतून ग्राम पंचायत स्तरावर विकास काम केले जातात परंतु कोणत्या योजनेतून काय काम केली जात आहे याची परिपूर्ण माहिती ग्रामस्थांना नसते तसेच दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण मटेरियल वापरत नसून केलेली कामे काही दिवसात आपले अंतरंग दाखवतात.
जसे की, नवीन गावठाण मध्ये लाखो रुपये खर्च करून मुख्य गटार बांधण्यात आली मात्र त्या गटारीचा काही एक उपयोग होत नाही ती गटार बांधून एक वर्ष पूर्ण होत नाही तो पर्यंत ठिकठिकाणी तडे गेल्याचे व आतील सळ्या उघड्या पडल्याचे निर्दशनास आल्याने तसेच नवीन गावठाण परिसरात गटारी चे उतरती लेव्हल नसल्याने सांडपाणी पाणी वाहत नसून सर्व पाणी तिथेच जमा होत असते.हे काम कोणत्या पद्धतीने केले आहे याची कोणालाच काही एक माहिती नाही.ग्राम पंचायत मार्फत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विकास कामांना शासन निर्णयानुसार माहिती दर्शक फलक लावणे बंधनकारक करण्यात आले असताना येथे शासनाच्या आदेशाची पायमल्ली होताना चे चित्र दिसत आहे.
त्याच प्रमाणे इस्टीमेट इंग्रजी भाषेत असल्याने ग्रामस्थांची दिशाभूल करून कामे केली जातात इस्टीमेट प्रमाणे कामे होताना दिसत नाही. ग्राम पंचायत मार्फत ठेकेदारांकडून गावातील विविध कामे करवून घेण्यात येतात मात्र कुठले काम सुरू आहेत कधी पूर्ण होणार किती खर्च आला कोण ही कामे करत आहे.या बाबत जाणून बुजून विकास कामाचे फलक लावले जात नाही.तर टाळाटाळ करण्यामागे काय कारण आहे..?या गोष्टीची दखल वरिष्ठ अधिकारी घेतील का . ? या कडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष वेधले आहे. ( भाग २)