खिर्डी खु येथे साफ सफाई अभावी गटारी झाल्या ओव्हर फ्लो…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। स्वच्छ गाव सुंदर गाव नारा देत आपले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाकडून बॅनर,होर्डिंग्ज, वृत्तपत्रे इत्यादी माध्यमांतून कोट्यवधी रुपये खर्च करून जनजागृती करण्यात येते गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येतो, मात्र रावेर तालुक्यातील खिर्डी खु.गावाची वाटचाल हि तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असून गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकी कडे कोरोनाची धास्ती अन गावात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने इतर आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.ग्राम पंचायतीला अनेक योजनाच्या माध्यमातून स्वच्छते साठी निधी मिळतो मात्र निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो का ? हे गावातील अस्वच्छता वरून दिसून येते गावातील अनेक भागातील नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या असून कधी कधी घाणपाणी लोकांच्या अंगणात वाहताना बघावयास मिळते तर काही वार्डात कचरा अस्ताव्यस्त पसरून रोगराईला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे.एक वेळ सुध्दा वार्ड सदस्य यांनी साधी पाहणी सुद्धा केलेली नसून फक्त निवडणूक काळात केलेल्या घोषणा हवेतच विरल्या की काय असे वाटू लागले आहे. स्वच्छ व हागणदारी मुक्त गाव फलकावर च असल्याने या बाबत आता पर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा पाहणी करण्यात आलेली नसून एकवेळ जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय अधिकारी यांनी गावात फिरून पाहणी करावी अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे