खिर्डी परिसरात अवैध वाळू वाहतूक जोमात… महसूल विभाग कोमात….!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (विशेष प्रतिनिधी): खिर्डी परिसरातील आजूबाजूच्या गावात सध्या बांधकामे जोरात सुरू असल्याने वाळू टंचाई मुळे मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने ३ते४ हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे ज्यादा दराने वाळूची विक्री केली जात आहे.तसेच अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सकाळी ४वाजेपासून ते ८ वाजे पर्यंत रस्त्याने भरधाव वेगाने जात असून एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नाहक कुणाचा बळी जाईल ते सांगता येत नाही.तसेच बलवाडी रस्त्याच्या आजूबाजूला घरे असल्याने ट्रॅक्टर च्या कर्कश आवाजाने लहान मुलांची झोपमोड होत असून दिवस भर चिडचिड करतात याचा पालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.मात्र या सर्व प्रकाराकडे महसूल प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गावामधून वाळूची सर्रास पणे वाहतूक होत आहे मात्र या वाळूच्या ट्रॅक्टर ची तपासणी करण्यासाठी महसूल प्रशासनाचे पथक आहे कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अवैध वाळू वाहतुकीला अंकुश लावणे गरजेचे असताना ही अवैध वाळू वाहतूक शासकीय महसूल अधिकाऱ्यांना दिसत नाही काय ,की आर्थिक देवांणघेवाणीतून जाणून बुजून तर दुर्लक्ष्य केले जात नाही ना असा प्रश्न पडतो. यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे लवकरच याबाबत प्रशासनास निवेदन देण्यात येणार असल्याचे आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.