भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी बुद्रुक येथील काँक्रीटिकरणा ची चौकशी करण्यास अधिकाऱ्यांनची टाळाटाळ, कोणाचा आहे वरदहस्त या प्रकरणात ?

खिर्डी (प्रतिनिधी)। खिर्डी बु. येथील 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत झालेल्या निकृष्ठ काँक्रीटिकरण ची कामाची चौकशी मागणी दि.22 जून 20 रोजी गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली होती त्याचप्रमाणे त्याची प्रत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव,मा.जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव यांच्या कडे सुध्दा पाठवली आहे तरी 15 दिवस होऊन काही ठोस पावले न उचलल्यामुळे त्यांना दि.8.जुलै 20 रोजी एक स्मरण पत्र दिले परंतु पुन्हा 15 दिवस उलटूनही कुठलीच कार्यवाही होत नसल्याने प्रत्यक्ष 22 जुलै 20 ला प.समिती रावेर येथे जाऊन मा.गटविकास अधिकारी सौ.मॅडम यांची भेट घेतली असता संबंधित सर्व प्रकरण ची माहिती दिली.

तसेच आपल्या कार्यालयातुन सादर केलेले तक्रार अर्जाचे फोटो काढून किंवा प.समितीतून संबंधित व्यक्तीकडे प्रसारित होऊन तक्रारदार यांचा अपप्रचार व शिव्या, धमकी येत असल्या बाबत ची माहिती दिली. व त्यासंबंधी 23 जुलै 2020 रोजी वरिष्ठ अधिकारी यांच्या दप्तरातून कागदपत्रे अश्या पद्धतीने लीक व व्हायरल होत असतील तर वरिष्ठ अधिकारी यांच्यावरील विश्वासाला ही ठेस आहे.व अशी कागदपत्रे लीक व व्हायरल करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी.व संबंधित प्रकरणाची सायबर सेल मध्ये गुन्हा नोंदवावा अशी लेखी तक्रार सुध्दा मा.गटविकास अधिकारी सौ.नाकडे मॅडम यांच्याकडे केलेली आहे. तरी अधिकारी या बाबी कडे व सदर कामाची चौकशी करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने काँक्रीटिकरणाची चौकशी करणेसाठी मुहुर्त सापडत नसून पुन्हा स्मरणपत्र-2 देण्यात आले.सदर काँक्रीटिकरणाची चौकशी करण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनायक जहुरे तथा तक्रारदार यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!