खिर्डी बुद्रुक येथे कोरोनाचा वाढता आलेख,पुन्हा तीन जण कोरोना बाधित…
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील कोरोनाने थैमान घातले असून दि ९ रोजी दोन कोरोना बाधित रुग्ण आढल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.त्यानंतर बाधित रुग्णाच्या संपर्कातील एकूण ९ संशयितांचे स्वाब घेण्यात आले होते.त्यातून काल रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये एकच कुटुंबातील तीन रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. नंतर पुन्हा बेघरवस्तीतील बाधित महिला रुग्णाच्या संपर्कातील तीन जण पॉझिटिव्ह आढळले असून गावाची चिंता वाढली आहे. यात एक ४५ वर्षीय पुरुष तर १० वर्षाची मुलगी व १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. खिर्डी बुद्रुक गावात एकूण रुग्ण संख्या आठवर पोहचली असून गावात खबरदारी व सतर्कता तसेच नियमाचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. गावात आरोग्य विभाग तसेच ग्राम पंचायत प्रशासन च्या वतीने घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
खिर्डी येथून जवळ असलेल्या गोलवाडे येथील 35 वर्षीय पुरुषाला सुद्धा लागण झाली आहे. व कोळदा येथील 1 महिला रुग्ण वय ८० वर्ष बाधित आढळली आहे. खिर्डी, कोळदा,गोलवाडे येथील रुग्ण अंजाळे येथील अंत्ययात्रेत सामिल झालेले असल्याने लागन कोरोनाची लागण झाली आहे.