भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी बु.! ग्रामपंचायत पाय मोडल्यावरच धापा बुजणार का.?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): खिर्डी बु. येथील आंबेडकर नगरातील रहिवाशांमध्ये संतापाची व नाराजीची लाट आहे. दलित वस्ती सुधार व इतर योजनेअंतर्गत काँक्रीटीकरण नुकतेच करण्यात आले आहे. कॉंक्रिटीकरण करून एक वर्षाचा कालावधी ही उलटत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीकडून पाण्याची नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी काँक्रिटीकरण खोदून टाकण्यात आले. व रस्त्याचे विद्रुपीकरण केले गेले.

सविस्तर वृत्त असे की आंबेडकर नगरात ज्या ठिकाणी जुनी तसेच कमी पाणी येत असल्या कारणाने नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी काँक्रीटीकरण खोदकाम केलेले आहे. व रस्ता पूर्ण खराब करण्यात आला आहे तसेच पाईपलाईन साठी नालीवरील धापा फोडून पाईप टाकण्यात आलेली आहे परंतु काम पूर्ण झाल्यावर सुद्धा फोडलेला धापा व फोडलेले कॉंक्रिटीकरण पुन्हा अद्ययावत काँक्रीटीकरण करून बुजलेले नाही. हा संपुर्ण प्रकार ग्रामपंचायत/ग्रा.अधिकारी/सरपंच/वार्ड प्रतिनिधी यांना माहीत असल्यावरही कुंभकर्णाच्या झोपेत आहे की काय.? व रस्त्याच्या कामाबाबत वेळ मारून देण्याचे काम मात्र प्रगतीपथावर दिसत.

या संबंधित ग्रामपंचायत ला धापा बुजण्याचा मुहुर्त काही सापडत नाही.?असे चित्र सध्या आंबेडकर नगर मध्ये दिसत आहे व धापा बुजण्याचे काम गुलदस्त्यात दिसून येत आहे या ठिकानाची अशी दुरवस्था आहे तर गावातील इतर ठिकाणचे काय हाल असतील ? गल्लीतील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून जातांना व येतांना लहान मुलं/शेतकरी, मजूर/यांना सांभाळून जावे लागत आहे व हा फोडलेला धापा दुखापत होण्यास कारणीभूत ठरत असल्याने हा प्रकार कुठपर्यंत चालणार असून किती सहन करायचा असे देखील रहिवाशांकडून बोलले जात आहे तसेच आमचा पाय मोडल्यावरच फोडलेला धापा बुजणार का.? तरी या संपूर्ण रस्त्याचा व गल्लीतील जाणारे येणारे महिला पुरुष/लहान मुलं व रहिवाशांना होणाऱ्या त्रास/या अवस्थांचा ग्रामपंचायत ने विचार करून लवकरात-लवकर दखल घ्यावी. असे मत तथा प्रतिक्रिया आंबेडकर नगर (वार्ड)येथील रहिवाशी नितीन जाधव यांनी “मंडे टू मंडे ” च्या स्थानिक प्रतिनिधी शी बोलतांना दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!