भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

खिर्डी-भामलवाडी रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। आठवडे बाजार लगत असलेल्या खिर्डी ते भामलवाडी रस्त्याच्या बाजूला गावातील सांडपाण्याचा योग्य तो निचरा होण्या करिता मुख्य गटारी असून काही महिन्यांपूर्वी या गटारीतील केर कचरा व गाळ युक्त घाण जेसीबीच्या साहाय्याने साफ सफाई करण्यात आली असून सदरील घाण तशीच पडून राहिल्याने त्या ठिकाणी गावातील पशुपालक शेळ्यांचे मलमुत्र व पालापाचोळा टाकत असून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून वाहतुकीस सुध्दा अडथळा ठरत आहे.तसेच गावातील नागरिकांचे व रस्त्यावरून येजा करणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या बाबत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना वारंवार तोंडी सांगून सुध्दा काहीच फरक पडत नाही.तसेच गावातून जमा झालेल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने हा कचरा परत कोरडा झाल्यावर गटारीत पडत असून ओव्हरफ्लो होत असतात.तर गटारींची साफ सफाई करून उपयोग तरी काय? त्यातच हा कचरा रस्त्याने येणारे जाणारे पेटवून देत असल्याने यामधून अनेक प्रकारचे विषारी धुरामुळे वायू प्रदूषण होत असल्याने यापासून नागरिकांना अस्थमा,श्वसनसंबंधित आजार होण्याची दाट शक्यता असते.विशेषतः लहान मुलांच्या वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होवून आरोग्य खालावू शकते.कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या,पाला पाचोळा, जुने कपडे, यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून या वस्तू जाळल्याने अती विषारी धुरामुळे वायू प्रदूषण होत असते.सध्या कोरोना महामारीच्या काळात लवकरात लवकर साफ सफाई करण्यात यावी हा प्रश्न मार्गी लावावा.दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी या विषयी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!