खिर्डी येथील बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी
खिर्डी, ता.रावेर(प्रतिनिधी)। येथील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने रहदारीस अडथडा निर्माण होत आहे .
या बाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील खिर्डी गाव हे मध्यवर्ती ठिकाणी असून या गावाला दहा ते बारा खेडे लागून असल्याने व खिर्डी ही मुख्य बाजार पेठ असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ वाढलेली असल्याने या गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोटर सायकली, व इतर वाहने बेशिस्त पणे लावतात तसेच रस्त्याच्या टर्निंग पॉईंट ला वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अश्या प्रकारे मोटर सायकली उभ्या करतात. तसेच या रस्त्यावरून ट्रॅक्टर ,बैलगाडी ,ट्रक ,एसटी बस अशी मोठी वाहने सुद्धा ये-जा करीत असतात आशा वेळी समोरून मोठे वाहन आल्यास प्रश्न पडतो की आता साईड द्यायची कशी सदर ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने कुणाला धक्का लागल्यास शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीत होते या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या त्वरित सोडवावी. सदर ठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल सुज्ञ नागरिकाकडून व्यक्त केला जात आहे.