क्राईमरावेर

गावठी कट्ट्यासह एकास अटक रावेर पोलिसांची कामगिरी

रावेर (प्रतिनिधी)। शहरा बाहेर एका तरूणाला गावठी कट्टा आणि काडतूसह आज रावेर पोलीसांनी अटक केली .

रावेर येथील पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार संशयित आरोपी साईम जानबाज बेलदार हा दुपारी ,एमएच ३९ ई ८८१९ क्रमांकाच्या दुचाकीने रावेर शहरात येत असल्याचे समजले. पो.नि.वाकोडे यांनी पथक तयार करून संशयित आरोपी साईम बेलदार याला गावठी कट्टा, एक काडतूस आणि दुचाकीसह अटक केली आहे. त्याच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला . ही कारवाईन पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मंदार पाटील, विठ्ठल देशमुख, प्रमोद पाटील, विशाल पाटील, कुणाल सोनवणे, महेश मोगरे, पुरषोत्तम पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!