अवैध गुटक्याची वाहतूक करणाऱ्यास मुद्देमालासह अटक
जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील अजिंठा चौफुलीवर बेकायदेशीर गुटखाची वाहतूक करणाऱ्या दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत करत एकास अटक करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून दोन जणांन विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिलेल्या माहिती वरून सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील अजिंठा चौफुलीवर सापळा रचून संशयित आरोपी भगवान प्रभाकर पाटील (वय ५२) व विजय चौधरी रा.एरंडोल बसस्थनकाजवळ यांना ताब्यात घेवून त्यांच्या कब्जातील ६३ हजार ९१० रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दोघांविरोधात भादवि कलम २७२, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुनिल दामोदरे, राहुल पाटील, विनायक पाटील, किरण चौधरी यांचे पथकाने केली.