भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीयसामाजिक

गुलाबी बोंड अळींच्या नियंत्रणासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहिमेस खासदार रक्षा खडसे यांनी दाखवला हिरवा झेंडा !

मुक्ताईनगर: मुक्ताईनगर तालुक्यात २० हजार हेक्टर कपाशीची लागवड केली असून कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी व प्रभावी उपाययोजनेसाठी कृषी विभागातर्फे जनजागृती मोहिमेचा प्रारंभ झालेला आहे.

या वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट आले आहे. पांढरा कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बीटी कपाशीवर येणाऱ्या गुलाबी बोंड अळीने नुकसान होऊ नये. अशी आशा खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राशी सिडस यांच्या संयुक्त विद्यमाने कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण विषयी जनजागृती मोहीम व उपाययोजना करण्यासाठी चित्ररथाचे आयोजन करून आजपासून ह्या चित्रराठचें मोहिमेचा शुभारंभ मुक्ताईनगर येथे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. कापूस या नगदी पिकासाठी चा पेरा ७० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी केला असल्याने भविष्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाला जाणवू लागली आहे. हा धोका होऊ नये म्हणून राशी सीड्स च्या सहकार्याने महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू झाली आहे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या असून उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे.

बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी 5 कामगंध सापळे लावून डोम कळ्या व किडलेली फुले नष्ट करावेत. पीक फुलोरा किंवा व बोंड धारण अवस्थेत असताना फवारणी करण्यात यावी यात पाच टक्के निंबोळी अर्क अथवा १५०० पीपीएम आयझरकर्टीन म्हणजे निमार्क हे २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात अथवा जैविक बुरशीनाशक बिव्हेरिया बॅसियाना १.१५% हे ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. ही फवारणी करताना वातावरणात पुरेशी आद्रता असावी. बोंड अळीचे ५% नुकसान आढळल्यास थायोडीकॉम ७५% डब्लू पी २५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५% इसी २५ मिली किंवा क्लोरो पायरी फॉर्स २५% प्रवाही २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी यासाठी कामगंध सापळे राशी सीड्स मार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात येत आहे अशा सूचना व शेतकऱ्यांसाठी जनजागृती कृषी विभागामार्फत मुक्ताईनगर तालुक्यात सुरू करण्यात आली आहे संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे याप्रसंगी बोदवड पंस समिती सभापती किशोर गायकवाड, कृषी अधिकारी, राशी सिडस चे टेरिटेरी मॅनेजर चेतन शिंदे, बोदवड शहर शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, सरचिटणीस निलेश पाटील, मुक्ताईनगर तालुका भाजयुमो अध्यक्ष अंकुश चौधरी, शुभम पाटील व तालुक्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कपाशी बोंड वरील बोंड आळी चे सूक्ष्म निरीक्षण करून तातडीने उपाययोजना कराव्यात व कीड नियंत्रण फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!