भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी खु येथे ८ ते १० कोंबड्या व १ कबुतराचा मृत्यु; पशू वैद्यकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): सध्या खिर्डी खु.या गावात गेल्या चार ते पाच दिवसात अचानक पणे कोंबड्या व इतर पक्षी मरत असल्याने पक्षी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळच्या वेळेस रोज रस्त्याच्या कडेला उघड्यावर एक दोन मेलेली कोंबड्या पाहवयास मिळतात कोरोना महामारी नंतर आता सध्या बर्ड फ्ल्यू नामक आजाराने राज्यात घुसखोरी केल्या मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये या बाबत जनजागृती नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशू वैद्यकीय अधिकारी यांना मेलेल्या पक्षाची माहिती दिली असता त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तसेच मेलेल्या पक्षांची तपासणी करणे गरजेचे असून.शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांची विल्हेवाट लावणे अत्यंत महत्वाचे असून सुध्दा त्यांनी या गंभीर समस्येकडे कडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या चार -पाच दिवसांपासून आठ ते दहा कोंबड्या खिर्डी गावात मृत पावलेल्या असून ह्या मृत कोंबड्या पशु पालक उकिरड्यावर अथवा रस्त्याच्या कडेला टाकून देत असता कुत्रे ह्या मेलेल्या कोंबड्या उचलून घेऊन जातात,

तसेच पाण्याच्या टाकी जवळ एक मृत पावलेले कबुतर सुद्दा आढळून आल्याने बर्ड-फ्ल्यू च्या पाश्वभूमीवर या कडे संबधित अधिकारी व वरिष्ठ पशु अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे व खबरदारीचा उपाय म्हणून कोंबड्यांचा सर्व्हे करणे अती आवश्यक आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!