ताज्या बातम्यायावल

गोदावरी हॉस्पिटल कडून संशयिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात; मृत व्यक्तीवर अनेकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार गुन्हा दाखल

यावल(प्रतिनिधी)दि.२: यावल तालुक्यातील कोरपावली येथील एक वृद्ध इसम कोव्हिड संशयित म्हणून गोदावरी हॉस्पिटल मध्ये औषध उपचार घेत असताना मयत झाल्या नंतर मृताचा देह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने मयताच्या मुलाने त्याचे घरी व व कब्रस्तान मधील सार्वजनिक जागेवर अंदाजे 100 लोकांची गर्दी करून जिल्हाधिकारी जळगाव यांनी जारी केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 चे उल्लंघन केलेले आहे म्हणून कोरपावली तालुका यावल येथील पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला मयताच्या मुला विरुद्ध आज दिनांक 2 जुलै 2020 गुरुवार रोजी सकाळी 1 ते 2 वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली असल्याने तसेच गोदावरी हॉस्पिटल मधील यंत्रणे मार्फत कोविड -19 विषाणूला राजकीय लागण लागल्याचे बोलले जात आहे. कोरपावली येथील पोलीस पाटील सलीम रमजान तडवी यांनी यावल पोलीस स्टेशनला दिनांक 2 जून 2020 गुरुवार रोजी दिलेल्या तक्रार मध्ये म्हटले आहे की कोविंड– 19 साथीचा आजार रोखण्यासाठी तयार केलेली आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून काम करीत आहे,

कोरपावली गांवातील सत्तार नथू पटेल 81 यांना त्यांचे कुटुंबातील बरेच लोकांना मी ओळखतो सत्तार नथू पटेल यांना दिनांक 27 जून 2020 रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना गोदावरी हॉस्पिटल नशिराबाद येथे औषध उपचार साठी घेऊन गेले होते तेथे त्याचे कोरोना संशयित म्हणून नमुने घेण्यात आले होते तसेच सत्तार नथू पटेल यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल नशिराबाद येथे औषध उपचार सुरू असताना ते दिनांक 29 जून 2020 रोजी मयत झाले होते, मयत पटेल हे कोविडी- 19 संशयित असल्याने त्यांचे प्रेत अंत्यविधी करिता योग्य त्या अटी व शर्ती सह त्यांचा मुलगा जलिल सत्तार पटेल राहणार कोरपावली यांच्याकडे दिनांक 30 जून 2020 रोजी प्लास्टिक मध्ये सुरक्षित बांधून कोणताही विधी न करता सरळ कब्रस्तान मध्ये घेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देऊन प्रेत ताब्यात दिले होते, सत्तार नथू पटेल यांचे प्रेत त्यांचा मुलगा जलील सत्तार पटेल यांनी व त्यांचे नातेवाईक जावेद मुस्ताक पटेल, मुबारक सलीम पटेल, इक्बाल पटेल, व इतर नातेवाईकांनी मयताचे प्रेत कब्रस्तान मध्ये न नेता त्याचे घरी घेऊन जाऊन मयत सत्तार पटेल याचे प्रेतावरील बांधलेले प्लास्टिक सोडून मयतास आंघोळ घातली होती त्या वेळी सदर ठिकाणी जलील सत्तार पटेल, जावेद मुस्ताक पटेल, मुबारक सलीम पटेल, इमरान इक्बाल पटेल व इतर जवळपास 100 लोक मयत सत्तार पटेल याचे अंत्यविधीसाठी जमलेले होते व त्यांनी लॉकडाऊन व संचार बंदी चा नियम मोडून मयत पटेल यांच्यावर दफन विधी केला आहे. पोलीस पाटील यांच्या तक्रारीनुसार तसेच कोविड-19 संशयित मृत घोषित केले असल्याचे माहित असताना सुद्धा जलील पटेल यांनी त्यांचे नातेवाईक व जवळपास 100 लोकांना जमवून जिल्हाधिकारी जळगाव यांनी जारी केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे उल्लंघन केले आहे म्हणून यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गु. र. न. 61 / 2020 भा.द.वि.का. 1860 चे कलम ( 45 ) चे उल्लंघन क. 188 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005 चे कलम 59 प्रमाणे मृत व्यक्तीचा मुलगा जलील पटेल यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल असलम खान हे करीत आहेत.

जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी.

संपूर्ण जगासह भारतात आणि जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरस संक्रमण वेगाने पसरले आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यावल तालुक्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू दर कमी असला तरी कोरोना रूग्णांच्या संख्येत ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आणि झपाट्याने वाढ होत आहे अशा परिस्थितीत कोविड सेंटर असलेल्या नशिराबाद येथील गोदावरी हॉस्पिटल मधून कोविड संशयित मृत व्यक्ती सत्तार नथू पटेल या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात का दिला गेला ? मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि गोदावरी हॉस्पिटलचे संचालक यांचे आपुलकीचे आणि राजकीय संबंध आहेत का ? कोविड संशयित शव गोदावरी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिलेच कसे ? याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी चौकशी करून कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!