भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी)। कुऱ्हाडदा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेली असता, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ११ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुऱ्हाडदा येथील १७ वर्षीय मुलगी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील वाड्यात बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेली असता गावातील संशयित आरोपी रूपेश ज्ञानेश्वर सपकाळे (कोळी) हा नदीकडून पायी जात असतांना त्याचे लक्ष मुलीकडे गेले. त्यावेळी त्यांनी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून ‘झोपड्यात चल’ असे म्हटल्यावर तीन हात झटकून पळत घरी आली. आपल्यावर घडलेली घटना पिडीत मुली आपल्या आईवडीलांना सांगितला. या प्रकरणी पिडित बालिकेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला संशयित आरोपी रूपेश कोळी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!