भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

चिंताजनक: चिनावलात गेल्या 20 तासात पुन्हा 3 रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित ;यासह विवरे,वाघोड,रसलपुर,केऱ्हाळे प्रत्येकी एक !

चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। चिनावल गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे.गेल्या 20 तासांमध्ये गावातील 3 रुग्ण बाधित आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे. काल रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील एका 60 वर्षीय रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल बाधित आढळून आला होता. त्यापाठोपाठ आज सकाळी चिंचवाडा परीसरातील एका 65 वर्षीय महिलेचा अहवाल बाधित आला असून आता परत एका 70 वर्षीय पुरुषांचा अहवाल बाधित आढळून आला असुन सदरील रुग्ण खिरोदा रोड सरकारी दवाखान्याजवळील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाइन करण्यात येत असुन सदरील वृत्ताने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. सदरील वृत्तास स्थानिक प्रशासनाने गावच्या सरपंच यांनी दुजोरा दिला आहे. योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले.

तसेच विवरे गावात एक, वाघोड येथे एक, रसलपूर गावात एक तर केऱ्हाळे येथे एक असे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
रावेर तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 234 झाली असुन या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!