भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्या

चिंताजनक: जळगाव जिल्ह्यात रुग्ण संख्या ५ हजार पार आज तब्बल २०७ रुग्ण बाधित !

जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २०७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २०७ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ३९ रूग्ण हे अमळनेर शहरातील आहेत. याच्य खालोखाल जळगाव शहर २२, पाचोरा १०, चाळीसगाव ३, रावेर ३०, बोदवड ६, जळगाव ग्रामीण ७, चोपडा १८, भुसावळ ८, भडगाव १, धरणगाव २३, यावल ३, एरंडोल १८, मुक्ताईनगर १९, जामनेर १, पारोळा १, आणि अन्य जिल्ह्यातील-१ अशी रूग्णसंख्या आहे.

आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५ हजार १० इतका झालेला आहे. यातील २९८३ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १२५० रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा डेडीकेटेड कोविड रूग्णालयात ५१ तर कोविड रूग्णालयात ४२५ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आज आठ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनाच्या बाधेमुळे मृत झालेल्यांची संख्या ३०१ इतकी झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!