आरोग्यजळगाव

चिंताजनक! जळगाव जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २२ हजार पार, आज नविन ६०५ बाधित रुग्ण !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ६०५ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित एरंडोल तालुक्यातील आणि जळगाव शहरातील आढळून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १०१ रूग्ण हे एरंडोल तालुक्यातील आढळून आले असून याच्या खालोखाल ९७ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर ६०, जळगाव ग्रामीण १३, जामनेर ३३, पाचोरा ३६, भुसावळ ८, अमळनेर ८१, पारोळा ७, चोपडा ४६, भडगाव ४७, धरणगाव ५, यावल २८, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर १, बोदवड १०, अन्य जिल्हा ३ असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा २२३१८ इतका झालेला आहे. यातील १५४५३ रूग्ण बरे झाले आहेत. आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ७२९ इतकी  तर उपचार घेत असलेले ६१३६ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!