चिंता कायम; जळगाव जिल्ह्यात आज आणखी २९२ रुग्णांना कोरोनाची बाधा !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २९२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २९२ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ८२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जामनेर ३३, मुक्ताईनगर ३१, पारोळा १४, पाचोरा १, चाळीसगाव १७, रावेर ०८, बोदवड १९, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ १८, भडगाव १, धरणगाव ४, यावल १४, एरंडोल १७ व अन्य जिल्ह्यातील १ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५३०२ इतका झालेला आहे. यातील ३०७९ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १९१४ रूग्ण उपचार घेत आहेत. आज ८ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनाच्या बाधेमुळे मृत झालेल्यांची संख्या ३०९ इतकी झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.