चिंतेत पुन्हा वाढ: सावद्यात पुन्हा एका पुरुषाचा कोरोना तपासणी अहवाल बाधित !
सावदा(प्रतिनिधी)। तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सावदा शहरातही सुरवतीला कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता मात्र दिलासादायक बाब बऱ्याच दिवसांपासून शहरात बाधित रुग्ण आढळून आला नव्हता परंतु तर आज सकाळी एक रुग्ण तर आता आलेल्या माहिती नुसार गांधी चौक परिसरातील 57 वर्षीय पुरुषाचा अहवाल बाधित आढळून आल्याने परिसरात चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे. या आधी आज सकाळी धान्य मार्केट परिसरातील निमजाय माता नगर येथिल रहिवासी एक 53 वर्षीय रुग्ण बाधित आढळून आल्या नंतर 9:50 ला त्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. व आता पुन्हा एक बाधित आल्यान परिसरात चिंता पसरली आहे तर आता आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 3 व्यक्तींना कॉरंटाइन करण्यात येत असून परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. सदरील वृत्तास मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 51 झाली असुन त्यात 9 मयत तर 12 उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.