चिनावलात कोरोनाचा वाढता आलेख; शेतकऱ्यां सह दोन रुग्ण बाधित!
चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। चिनावल गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे. आज आलेल्या अहवालात गावातील 2 रुग्ण बाधित आढळुन आल्याचे निष्पन्न झाले आहे. आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील एक 42 वर्षीय शेतकरी व एक 52 वर्षीय पुरुष रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल बाधित आढळून आला आहे.
काल चार रुग्ण बाधित आढळुन आले होते व आता पुन्हा दोन अहवाल बाधित आढळून आल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. सदरील सर्व रुग्ण चिंचवाडा परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कातील 10 व्यक्तींना कॉरटाइन करण्यात आले असुन सदरील वृत्ताने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. तर दिलासादायक असे की, काही रुग्ण कोरोनावर मात करून घरी परत आहे. सदरील वृत्तास स्थानिक प्रशासनाने गावच्या सरपंच सौ.भावना योगेश बोरोले यांच्या कडून दुजोरा मिळाला असुन योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले.
चिनावल गावांतील कोरोना बाधित रुग्ण संख्या 35 असुन त्यात 2 मयत आहेत तर काही कोरोनाला मात देत घरी परतले आहेत.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.