चिनावलात पुन्हा एका रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित !
चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील एका रुग्णांचा अहवाल बाधित आढळून आला आहे. गावात पुन्हा एका 60 वर्षीय पुरुषांचा अहवाल कोरोना बाधित आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे.सदरील रुग्ण महादेव वाडा भागातील रहिवासी असून रुग्ण राहत असलेला परिसर प्रशासनाकडून आधीच सिल करण्यात आलेला आहे. आलेल्या अहवालामुळे गावात चिंता पसरली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 8 व्यक्तींना कॉरंटाइन करण्यात आले आहे. सदरील वृत्तास स्थानिक प्रशासनाकडून दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.