चुंचाळे विद्यालयाचा निकाल ९२ टक्के; विद्यालयातुन युगंधरा राजपूत प्रथम
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी)। चुंचाळे ता यावल
येथिल श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल हा ९२ टक्के लागला आहे.यावर्षी विद्यालयातुन एकुण ५० विद्यार्थांनी परीक्षा दिली होती त्यातुन ४६ जण पास झाले असुन इतर ४ विद्यार्थांना पूर्नपरीक्षेसाठी पात्रता मिळाली आहे.
विद्यालयातुन सर्वप्रथम युगंधरा विठ्ठल राजपूत आली असुन तीला एकूण ४७३ गुण मिळाले.द्वितीय म्हणुन भुवनेश्वरी चंद्रकांत पाटील व प्रियंका राजू मराठे दोन्ही विद्यार्थींनींना संयुक्तपणे ४६५ गुण घेऊन आल्यात.तृतिय कुंभार संतोष रमेश याला ४४९ गुण मिळालेत. यशस्वी सर्व विद्यार्थांना प्रा शारदा चौधरी,प्रा राकेश अडकमोल,प्रा जमिला तडवी यांचे मार्गदर्शन मिळाले.यशस्वी सर्व विद्यार्थांचे कौतुक श्री वासुदेवबाबा अध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश चौधरी,उपाध्यक्ष साहेबराव पाटील,सचिव जगन्नाथ कोळी,प्राचार्य व्ही जी तेली,गटशिक्षणाधिकारी एजाज शेख,केंद्रप्रमुख प्रमोद सोनार,संस्थेचे सर्व संचालक,सर्व शिक्षक-शिक्षिका,वसतीगृह अधिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.