“चोपडा कोविड रुग्णालयात उद्या ऑक्सिजन पाईप लाईन चे काम सुरू होणार…
चोपडा ।
चोपडा उपजिल्हा रुग्णालयात अतिशय चांगली व्यवस्था आहे परंतु रुग्णाच्या बेड ला जोडणारी संयुक्त ऑक्सिजन पाईप लाईन नसल्याने बऱ्याच रुग्णांना जळगाव येथे हलवावे लागते अथवा नाशिक ला पाठवावे लागते व कोरोणा रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा हा मेडीसिन पेक्षाही महत्वाचे असल्याचे व त्यामुळे अडावद येथील एका डॉ मित्राचा मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा डॉ जुनेद व डॉ दीपक पाटील यांनी एस बी पाटील यांना सांगितले परंतु जेव्हा चोपडा च्या साऱ्या डॉक्टरांची झूम बैठक झाली त्यात डॉ दीपक पाटील,डॉ दिलीप पाटील,डॉ लोकेन्द्र महाजन,डॉ विनीत व डॉ अमित हे हरताळकर बंधू,डॉ भाटिया,डॉ देशपांडे ,डॉ नरेंद्र शिरसाठ साऱ्यांनी पेशंट ची संख्या कमी करण्याच्या उपाय सोबत पेशंट चोपडा येथेच कसा बरा होईल यासह मृत्यू झाल्याचं नाही पाहिजे यावर भर दिला.
त्यानंतर डॉ पंकज पाटील यांनी चोपडा कोविड सेंटर मध्ये लोकसहभागातून oxygen concentrator आणि प्रत्येक बेड ला O2 ची व्यवस्था जर झाली तर कोरोणा ग्रस्त रुग्णांना जळगाव येथे पाठवण्याची शक्यता कमी होईल त्यासाठी अशी pipe line ची व्यवस्था होणे गरजेचे आहे असे सुचवले.
सगळ्यांना पटले की प्रत्येक ठिकाणी सरकार पूर्ण पडणार नाही. केंद्राला संपूर्ण देशाची व राज्यसरकार ला देखील संपूर्ण राज्याची काळजी घ्यायची आहे,या सोबत सरकारचे उत्पन्न चे स्त्रोत देखील कमी झाले आहेत व मग सुरू झाला मदतीचा ओघ तो खालीलप्रमाणे….
(१)डॉ महेंद्र जैस्वाल…. ₹५०००/-
(२)ए पी आय मनोज पवार…. ₹५०००/-
(३)श्री सी एस पाटील….. ₹२१००/-
(४)डॉ विनीत/अमित हरताळकर..₹१००००/-
(५)श्री भरत पाटील (गनपुर/कतार देश)..₹१००००/-
(६) श्री नंदकिशोर सोनवणे….. ₹१०००/-
(७)श्री संजय बोरसे, वेलोदे. …. ₹५००/-
(८)बापुसो कैलास पा. माजी आमदार..₹५०००/-
(९)श्री सुनील जैन…. ₹१००००/-
(१०)तहसीलदार अनिल गावित… ₹११०००/-
(११)डॉ रवींद्र पाटील,पंकज नगर…₹११००/-
(१२)डॉ पराग पाटील, चहार्डी…… ₹११००/-
(१३)डॉ सुशील सुर्यवंशी….. ₹११००/(१४)भागवत महाजन(गोरगावले)..₹५०००/-
(१५)डॉ अजय करंदीकर…. ₹११००/-
(१६)डॉ संदीप काळे… ₹११००/-
(१७)चंद्रशेखर करंदीकर(गणपुर/पुणे)₹५०००/-
(१८)इजी विजय पुंडलिक पाटील(अकुलखेडा/मुंबई)..₹५०००/-
(१९)डॉ दीपक (साई)डॉ दिलीप नाना…₹१००००/-
(२०)डॉ नरेंद्र शिरसाठ…₹५०००/-
(२१)श्री नारायण पालीवाल…₹२१००/-
(२२)श्री हेमंत पाटील सर…..₹१०००/-
(२३)डॉ भूषण सोनवणे….₹३०००/-
(२४)अड दिनेश वाघ(बुधगाव)..₹५००/-
(२५)डॉ राजेन्द्र भाटिया….₹३५००/-
(२६)डॉ लोकेंद्र महाजन…₹५०००/-
(२७)श्री मयुर शिंदे….₹९११/-
आतापर्यंत ₹१,११,१११/-(एक लाख अकरा हजार एकशे अकरा)रुपये जमा झालेत.ते आज तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे सुपूर्द केलेत.चोपडा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ मनोज पाटील कार्य बाहुल्यामुळे आले नव्हते परंतु उद्या काम सुरू होईल व एका आठवड्यात जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येईल अशी व्यवस्था झाली.
मुंबई पुण्याला आपला रुग्ण पाठवला तर फक्त एवढ्यासाठी चार ते पाच लाख खर्च येतो मग आपल्या येथे थोडा निधी दिला तर पूर्ण रुग्णालय सुसज्ज करता येईल तरी दानशूर लोकांनी मदत करावी असे आवाहन एस बी पाटील यासह सारे कोरोनामुक्त चोपडा अभियानातील कार्यकर्ते करीत आहेत.यासाठी मयुर शिंदे,रमाकांत सोनवणे,सी एस पाटील,विपीन बोरोले,कुलदीप पाटील,हरिकेश पाटील मेहनत घेत आहेत.