चौघे भुरट्या चोरांना रावेर पोलिसांनी घेतले जाळ्यात !
रावेर (प्रतिनिधी)। शहरातील रहिवाशांच्या अंगणात ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्य , कुलर, लोखंडी आसार्या चोरून नेणार्या चार भुरट्या चोरांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडूनील चोरीचा 10 हजार 805 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, विजय भावसार (रा.महालक्ष्मी मंदिराजवळ, रावेर) यांच्या फिर्यादीवरून गणेश महाजन (21), अमान छप्परबंद (22), यश हंसकर (21) व अन्य एका अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून त्यांची चौकशी केल्यावर आरोपींनी चोरीची कबुली दिली. 9 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या या चोरीतील सिमेंटच्या 9 गोण्या, विविध साईझच्या लोखंडी आसार्या आणि कुलर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केले. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक महेंद्र सुरवाडे, कॉन्स्टेबल सुरेश मेढे, तुषार मोरे हे पुढील तपास करीत आहेत.