जम्मू – काश्मीरच्या अनंतनागमधील चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू – काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार लष्कर जवान आणि दहशवादी यांच्या अजूनही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Encounter has started at Khulchohar area of Anantnag. Jammu & Kashmir Police and security forces are on the job. Further details shall follow: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) June 28, 2020
यापूर्वी गेल्या आठवड्यात पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात हिजबुल मुजाहिद्दीनच्या सर्व अतिरेक्यांना ठार करण्यात आले होते. त्यामुळे त्राल भागात आता हिजबुल मुजाहिद्दीनचा एकही दहशतवादी नाही आहे, असा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी केला. १९८९ मध्ये काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी ठाण मांडला होता. दरम्यान, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घातलण्यात आले होते.
3 terrorists killed in J-K's Anantnag encounter
Read @ANI Story | https://t.co/ZVE6FReVMT pic.twitter.com/EzpSNYqQKr
— ANI Digital (@ani_digital) June 29, 2020
तर जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहारातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहितीही काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता. तसेच या दहशतवादी हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सीआरपीएफने दिली होती.