भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगांव मध्ये ८ वर्षीय बालकांचे अपहरण; आई ही बेपत्ता !

जळगाव प्रतिनिधी । येथील शिवाजीनगरातल्या हुडको परिसरातून ८ वर्षाच्या बालकाचे अपहरण करण्यात आले असून यानंतर त्याची आई जिल्हा रूग्णालय परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

शहरातील सुनील विश्‍वनाथ भागीरथे (३०) रा.शिवाजीनगर हुडको येथे वास्तव्यास आहे. घरात त्याची प्रेयसी माया अभिनंदन काशीकापडणे, तिचा मुलगा आदित्य व मुलगी मोनाली आदींसह अन्य सोबत राहतात. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुनील कामावर गेल्यावर त्याला वडीलांचा फोन आला. त्यांनी सांगितले की मी, माया व नात मोनालीसोबत सिव्हीलला औषधे घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा घराबाहेर आदित्य हा भाचा डिगंबरसोबत खेळत होता. याचवेळी अज्ञात लोकांनी आदित्यचे फूस लावून अपहरण केले. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात औषधी घेण्यासाठी गेलेली माया बराचवेळ झाला तरी परत आली नाही. माया व आदित्य यांचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. यासंदर्भात हरवल्याची तक्रार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!