जळगाव जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा ५० हजार पार;आज २८२ रुग्ण पॉझिटिव्ह
जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये २८२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून ५०५ रूग्ण कोरोनावर मात करत घरी परतले आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा ५० हजार पार केला आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार आज जळगाव शहर ७३ जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ३१, अमळनेर १५, चोपडा ४०, पाचोरा ४, भडगाव ३, धरणगाव २, यावल ५, एरंडोल १, जामनेर ७०, रावेर ९, पारोळा ४, चाळीसगाव १३, मुक्ताईनगर ६, बोदवड १ आणि इतर जिल्हातील ० असे एकुण २८२ रूग्ण आज आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ५०२२२ आढळून आले असून ४५३१० रूग्ण कोरोनाला मात देत घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण मृतांचा आकडा १२११ वर पोहचला असून आता ३७०१ रूग्ण उपचार घेत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरीचा रेट हा ९०.२२ टक्क्यांपर्यंत आला आहे.