जळगाव

जळगाव जिल्ह्यातील शाळा ७ डिसेंबर पर्यंत बंद राहणार

जळगाव प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नववी ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज परिपत्रकाद्व्यारे काढले आहे.

२३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय राज्य शासनाने घेतला होता. पंरतू दिवाळीत प्रवाश्यांची येणे व जाण्याची गर्दी आणि काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ७ डिसेंबर पर्यंत कोणतेही वर्ग सुरू न करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला आहे. तर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून ७ डिसेंबर नंतर शाळा सुरू ठेवावे की नाही याचा निर्णय पुन्हा घेण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद केले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेशाचे परिपत्रक काढले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!