जळगाव जिल्ह्यात आज आणखी २०५ रुग्ण कोरोना बाधित !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २०५ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५६ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल एरंडोल २३, धरणगाव २२, भुसावळ १६, जामनेर ५, चाळीसगाव ४, रावेर ११, आणि मुक्ताईनगर ७, जळगाव ग्रामीण ९, अमळनरे ८, चोपडा ९, पाचोरा ६, एरंडोल १, पारोळा १५, बोदवळ ५, भळगाव १, यावल ७ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६१६७ इतका झालेला आहे. यातील ३७४० रूग्ण बरे झाले आहेत. आज ६ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३३५ तर उपचार घेत असलेले २०९२ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.