भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १६९ रुग्ण कोरोना बाधित !

जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात १६९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल १६९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७३ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जामनेर १०, मुक्ताईनगर ०, पारोळा ०, पाचोरा ४, चाळीसगाव ४, रावेर ८, चोपडा १३, बोदवड १, जळगाव ग्रामीण १६, भुसावळ १३, भडगाव ४, धरणगाव ६, यावल ७, एरंडोल १ , अमळनेर ९,  व अन्य जिल्ह्यातील १ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

  आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५४७१ इतका झालेला आहे. यातील ३२२३ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १९३३ रूग्ण उपचार घेत आहेत. आज ६ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनाच्या बाधेमुळे मृत झालेल्यांची संख्या ३१५ इतकी झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!