भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात आज नविन २६८ कोरोना रुग्णांची नोंद !

जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २६८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २६८ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७८ रूग्ण हे जळगांव शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज जामनेर ८, चाळीसगाव २३, रावेर १५, भुसावळ २०, आणि मुक्ताईनगर ६, जळगाव ग्रामीण २२, अमळनरे ८, चोपडा ४२, पाचोरा ७, धरणगाव ७, पारोळा २, बोदवळ २, भळगाव १९, यावल ८ ,एरंडोल ० इतर १ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ९४५१ इतका झालेला आहे. यातील ६०४३ रूग्ण बरे झाले आहेत. आज १० मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ४६० इतकी  तर उपचार घेत असलेले २९४८ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!