जळगाव जिल्ह्यात आज ५१८ रुग्ण बरे; नविन ९११ कोरोना बाधित !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ९११ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगावात आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक २४० रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल १०२ रूग्ण हे अमळनेरचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर ५४, जळगाव ग्रामीण ४१, जामनेर ६३, पाचोरा ४४, भुसावळ ५४, पारोळा ४३, चोपडा ८२, भडगाव १०, धरणगाव ८, यावल १३, एरंडोल ६९, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर ४, बोदवड १०, अन्य जिल्हा ९ असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ३१६६० इतका झालेला आहे. यातील २२३६३ रूग्ण बरे झाले आहेत. आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ८५७ इतकी तर उपचार घेत असलेले ८४४० असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.