जळगाव जिल्ह्यात आज ३३० रूग्णांची कोरोनावर मात; नवीन २८७ बाधित !
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील आज आलेल्या कोरोना तपासणी रिपोर्टमध्ये आज जिल्ह्यात दिवसभरात २८७ बाधीत आढळून आले आहेत.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात २८७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात आज सर्वाधीक ६४ रूग्ण हे जळगावात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल ५० चोपडा तालुक्यातील आहेत, उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण १५, अमळनेर १९, रावेर ४, पाचोरा ४, भडगाव १३, धरणगाव ११, भुसावळ ४, यावल १५, एरंडोल ७, जामनेर १२, पारोळा २१, चाळीसगाव २४, मुक्ताईनगर १७, बोदवड ६ व दुसर्या जिल्ह्यांमधील १ असे रूग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या १८,५८४ इतकी झालेली आहे. यातील १२,७७४ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ३३० रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ९ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ६७१ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ५१३९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.