भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ५०३ रुग्ण कोरोना मुक्त; नविन २२९ पॉझिटिव्ह

जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात आज २२९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून ५०३ रूग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर २९, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ १२, अमळनेर ११, चोपडा ९, पाचोरा ३, भडगाव ०, धरणगाव ५, यावल ४, एरंडोल १, जामनेर १००, रावेर ९, पारोळा ६, चाळीसगाव २६, मुक्ताईनगर ०, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २२९ रूग्ण आज आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्ण ४९९४० आढळून आले असून ४४८०५ रूग्ण कोरोना मुक्त होत घरी परतले आहे. आज ३ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण १२०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आता ३९२६ रूग्ण उपचार घेत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरीचा रेट हा ८९.७२ टक्क्यांपर्यंत आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!