जळगाव जिल्ह्यात आज ६०५ रुग्णांची कोरोनावर मात; नविन ५९६ पॉझिटिव्ह !
जळगाव प्रतिनिधी । जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ५९६ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १०० रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ ८८, अमळनेर ७, चोपडा ५५, पाचोरा २०, भडगाव २६, धरणगाव २७, यावल ३९, एरंडोल २४, जामनेर ४२, रावेर २८, पारोळा ३६, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर २४, बोदवड ९ व दुसर्या जिल्ह्यांमधील १० असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४३८९७ इतकी झालेली आहे. यातील ३२९४१ रूग्ण बरे झाले आहेत. तर आज १६ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०९६ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९८६० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.