जळगाव जिल्ह्यात आज ६११ पॉझिटिव्ह; ८०९ रुग्ण बरे !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ६११ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर १४४, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ९५, अमळनेर ३७, चोपडा ५८, पाचोरा १६, भडगाव १५, धरणगाव ३३, यावल १८, एरंडोल २२, जामनेर ३३, रावेर ६, पारोळा ६०, चाळीसगाव २३, मुक्ताईनगर १२, बोदवड ११, व ईतर जिल्ह्यांमधील ७ असे एकुण ६११ रूग्ण आढळून आले आहेत.
आजच्या अहवालानंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४४९८३ इतकी झालेली असून यातील ३४३७५ रूग्ण बरे झाले आहेत. आजच ८०९ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ११ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११२५ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९४८३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.