जळगाव जिल्ह्यात आज ६२५ रुग्ण बरे; नविन ४७५ कोरोना पॉझिटिव्ह !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ४७५ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १११ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून जळगाव ग्रामीण १५, भुसावळ ४३, अमळनेर ४५, चोपडा ३९, पाचोरा ७, भडगाव ४, धरणगाव २२, यावल २०, एरंडोल १०, जामनेर १८, रावेर ४५, पारोळा २०, चाळीसगाव ४३, मुक्ताईनगर २२, बोदवड ७ व ईतर जिल्ह्यांमधील ४ असे रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-९९२५, जळगाव ग्रामीण-२२५३; भुसावळ-२७३२; अमळनेर-३८८१; चोपडा-३७२५; पाचोरा-१७१४; भडगाव-१७०२; धरणगाव-१९७३; यावल-१४६७; एरंडोल-२६३३, जामनेर-३११७; रावेर-१८५३; पारोळा-२२५५; चाळीसगाव-२८८७; मुक्ताईनगर-१२०२, बोदवड-७१५ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३३८ असे एकुण ४४ हजार ३७२ रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४४३७२ इतका झालेला आहे. यातील ३३५६६ रूग्ण बरे झाले आहेत. आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या १११४ इतकी तर उपचार घेत असलेले ९६९२ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.