जळगाव जिल्ह्यात आज ८०१ रुग्णांची कोरोनावर मात; नविन ७०३ पॉझिटिव्ह !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ७०३ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १०३ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून जळगाव ग्रामीण २५, भूसावल ४९, अमळनेर ७०, चोपडा ९९, पाचोरा ३०, भडगाव २०,धरणगाव २७, यावल १४, एरंडोल ६५, जामनेर ९३, रावेर १५, पारोळा ८, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर २२, बोदवड ३२ व इतर जिल्ह्यातील ४ असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४२५५९ इतका झालेला आहे. यातील ३१५०३ रूग्ण बरे झाले आहेत. आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या १०६१ इतकी तर उपचार घेत असलेले ३०३२ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.