भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच ,आज ११७९ नवीन रुग्ण; ११५९ रुग्णांची कोरोनावर मात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कमी होण्याचे नावच घेत नाहीय. आज देखील ११७९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासात ११५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आजही १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आता पर्यंत जळगाव जिल्ह्यात एकुण ९३ हजार ६०० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८० हजार ३३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार २८१ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आज १४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा १६८२ इतका आहे.कोरोना रुंगाची वाढती संख्या ही चिंता जनक आहे.

आज जळगाव शहर २४८, जळगाव तालुका २३, भुसावळ १५५, अमळनेर ५१; चोपडा २५७; पाचोरा ३६; भडगाव २९; धरणगाव ६१; यावल ५२; एरंडोल ३७, जामनेर ५५; रावेर ६८, पारोळा ३२; चाळीसगाव ०६, मुक्ताईनगर ०९; बोदवड ४९ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे ११७९ रूग्ण आढळून आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!