जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग! आज पुन्हा ५२८ बाधित रुग्णांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ५२८ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि पारोळा तालुक्यात आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक ९४ रूग्ण हे जळगाव शहरातील आढळून आले असून याच्या खालोखाल ६३ रूग्ण हे धरणगावचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर १६, जळगाव ग्रामीण १९, जामनेर ५०, पाचोरा १७, भुसावळ ८, अमळनेर ५०, चोपडा ३०, भडगाव ४८, धरणगाव ५, यावल ८, एरंडोल ५१, पारोळा १०, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर १४, बोदवड ३, अन्य जिल्हा २ असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १५३९१ इतका झालेला आहे. यातील १०६८० रूग्ण बरे झाले आहेत. आज ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ६१९ इतकी तर उपचार घेत असलेले ४०९२ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.