जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा ‘युटर्न’; आज कोरोनाचे तब्बल २१६ रुग्ण !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असताना आज मात्र कोरोना रुग्णसंख्येचा आकडा नागरीकांनी आणि प्रशासनाची धाकधूक वाढवणारा आहे. रोजच्या तुलनेत झालेल्या कोरोना चाचण्यांच्या तुलनेमध्ये आज रुग्ण संख्येत मोठी भर पडली आहे. यामुळे निश्चितच कोरोनाने युटर्न घेतला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही .जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 216 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 79, जळगाव ग्रामीण 02, भुसावळ 24, अमळनेर 16, चोपडा 17, पाचोरा 02, भडगाव 00, धरणगाव 03, यावल 02, एरंडोल 03, जामनेर 00, रावेर 02, पारोळा 03, चाळीसगाव 54, मुक्ताईनगर 04, बोदवड 01, अन्य जिल्हा 04असे 216 बाधित रुग्णसंख्या आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 535 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 56 हजार 98 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 371 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 28 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर १महिलेचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 1371 रुग्णांचा मृत्यू