भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात कोरोना बधितांची रुग्ण संख्या ७००० च्या उंबरठ्यावर !

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात नवीन ३१६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण ३१६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७८ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल भुसावळ ४४ व एरंडोल २६, जळगाव ग्रामीण १९, अमळनेर १५, चोपडा ७, पाचोरा ६, भडगाव १, धरणगाव १४, यावल ४, एरंडोल २६, जामनेर १६, रावेर २०, पारोळा ३, चाळीसगाव १५ व मुक्ताईनगर १६, बोदवड १ तर RATI ३१ रुग्ण अशी कोरोना बाधीतांची संख्या आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६९७० इतका झालेला आहे. यातील ४२३५ रूग्ण बरे झाले आहेत. तर एकुण उपचार घेत असलेले २३७७ रूग्ण आहेत. तसेच सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१५७७; कोविड हॉस्पीटलमध्ये-१७४ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ५१४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३५८ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!