जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा स्फोट आज तब्बल २५४ रुग्ण बाधित !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २५४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २५४ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६४ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत तर याच्या खालोखाल यावल २५, बोदवड २४, चोपडा २३, रावेर २२, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर २१, एरंडोल १३, अमळनेर १५, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ८, पाचोरा ४, धरणगाव ६, यावल ८, जामनेर २, पारोळा ३, आणि अन्य जिल्ह्यातील-२ अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.