भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात धोका वाढतोय आज ३८५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात ३८५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल ३८५ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७३ रूग्ण हे जळगांव शहरातील आहेत. याच्या खालोखाल रावेर ३, एरंडोल ७१, चाळीसगाव १५, भुसावळ १८, आणि मुक्ताईनगर ०, जामनेर ३२, जळगाव ग्रामीण १४, अमळनरे ३८, चोपडा ३२, पाचोरा ३२, धरणगाव ३८, पारोळा ४, बोदवळ २, भळगाव ७, यावल ४, इतर २ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १२७६६ इतका झालेला आहे. यातील ८९४५ रूग्ण बरे झाले आहेत. आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ५७६ इतकी  तर उपचार घेत असलेले ३२४५ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!