जळगाव जिल्ह्यात धोका वाढतोय! कोरोना रुग्ण संख्या १४ हजार पार, आज ४५६ नव्या रुग्णांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून जळगाव जिल्ह्यात आज ४५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल ४५६ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९६ रूग्ण हे अमळनेर मधील आहेत. याच्या खालोखाल जळगांव शहरातील ७७, रावेर १८, एरंडोल १८, चाळीसगाव ९, भुसावळ १५, आणि मुक्ताईनगर १३, जामनेर ३१, जळगाव ग्रामीण १४, चोपडा ५६, पाचोरा ३३, धरणगाव २७, पारोळा २४, बोदवळ ६, भळगाव १३, यावल ४ , इतर २ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १४३४३ इतका झालेला आहे. यातील ९८७३ रूग्ण बरे झाले आहेत. आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ६०८ इतकी तर उपचार घेत असलेले ३८६२ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.