भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्रमुक्ताईनगर

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला आहे का ? खासदार रक्षा खडसेचा पत्राद्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सवाल !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। काल पारोळा येथे 20 वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन चौघांनी अत्याचार केला आणि त्यानंतर तिला विष पाजून बेशुद्धावस्थेत फेकून दिले. पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अश्या घटना जिल्ह्यात घडत असून जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला आहे का ? असा सवाल खासदार रक्षाताई खडसेनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना विचारला आहे.

तसेच दिनांक 14 ऑक्टोबर रोजी भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात पाच वर्षाच्या मूकबधिर मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. त्यासोबतच रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे एका तरुणीवर अत्याचार करून तिच्यासह चार भावंडांची अत्यंत क्रूररित्या हत्या करण्यात आली.

या पीडितांच्या कुटुंबियांना दिलासा तर नाही देत येणार परंतु हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून, या नराधमांना भरचौकात फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. या सर्व घटनांचा तपास पोलिसांनी नि:पक्षपातीपणे करावा, तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषीवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

आरोपपत्र एका आठवड्यात दाखल व्हावे आणि खटला 2 महिन्यात संपवण्यात यावा.
गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी. महाराष्ट्रात महिला व मुलींवर अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तरी बलात्कार तसेच अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा कायदा सरकारने अंमलात आणावा.

ही अतिशय घृणास्पद व मानवजातीला काळीमा फासणारी घटना आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. सरकारी यंत्रणेचा या नराधमांना कोणताही धाक राहिलेला नाही त्यामुळे खुलेआम दिवसाढवळ्या असे प्रकार घडत आहेत. महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. महाराष्ट्र राज्यात स्त्रियांना निर्भयपणे जगता यायला पाहिजे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षा झालीच पाहिजे अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!